15 August 2020

News Flash

केजरीवालांपेक्षा राखी सावंतने उत्तम राज्य केले असते – शिवसेना

केजरीवाल यांच्यापेक्षा राखी सावंतने उत्तम राज्य केले असते व जे लोक राखी सावंत हिची ‘आयटम गर्ल’ म्हणून हेटाळणी करतात त्यांनी आता राखीचा सन्मान केला पाहिजे.

| January 24, 2014 11:59 am

आम आदमी पक्ष म्हणजे राजकारणातील ‘आयटम गर्ल’ अशी टीका लेखक चेतन भगत यांनी केल्यानंतर आता शिवसेनेनेही त्यांची री ओढली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्रात आज केजरीवाल यांच्यावर तोंडसुख घेण्यात आले आहे. “केजरीवाल यांच्यापेक्षा राखी सावंतने उत्तम राज्य केले असते व जे लोक राखी सावंत हिची ‘आयटम गर्ल’ म्हणून हेटाळणी करतात त्यांनी आता राखीचा सन्मान केला पाहिजे. कारण केजरीवाल व त्यांचा ‘आप’ सगळ्यात बदनाम ‘आयटम गर्ल’ बनला आहे.” असे शिवसेनेने म्हटले आहे.
काल (गुरूवार) मुंबईत पार पडलेल्या शिवसनेच्या शक्तिप्रदर्शनाच्या कार्यक्रमात कॉंग्रेसवर प्रहार केल्यानंतर, आज (शुक्रवार) केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी देखिल लोकभावनाच बोलून दाखवली असल्याचे म्हणत, ‘केजरीवाल हा येडा मुख्यमंत्री आहे’, या विधानालाही शिवसेनेने पाठिंबा दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2014 11:59 am

Web Title: rakhi sawant is better than kejriwal says shivsena
Next Stories
1 रेल्वे सोडा नि बसने जा!
2 गर्दी मोठी.. गर्जना छोटी..
3 चर्चा तर होणारच.. ‘भान’ हरपले
Just Now!
X