News Flash

कायदा तोडणाऱ्यांवर कारवाई करू; राज ठाकरेंच्या वक्तव्यावर राम शिंदे आक्रमक

महाराष्ट्रात कायदा तोडण्याची भाषा करणे योग्य नाही

राज ठाकरे

उद्योगपतींच्या फायद्यासाठी महाराष्ट्रात रिक्षा परवान्यांचे वाटप केले जाणार असून या रिक्षा रस्त्यावर आल्यास सरळ जाळून टाका, या राज ठाकरेंच्या विधानाचे पडसाद गुरूवारी विधिमंडळ अधिवेशनात उमटले. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. याठिकाणी अशाप्रकारे कायदा तोडण्याची भाषा करणे योग्य नाही. कायदा तोडल्यावर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिला. याशिवाय, भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे. इतकेच वाटत होते तर त्यांनी गेल्या दहा वर्षांत मराठी जनतेसाठी काय केले, असा सवाल काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी उपस्थित केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 10:42 am

Web Title: ram shindes reaction on raj thackerays speech
टॅग : Mns,Raj Thackeray
Next Stories
1 ‘ती’च्या कर्तृत्वाचा अविस्मरणीय मेळावा!
2 विकास आराखडय़ात सोसायटय़ांच्या अंतर्गत रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव!
3 प्रयोग म्हणून दिलेली जबाबदारी स्त्रियांकडून यशस्वी
Just Now!
X