News Flash

सरकारच्या विरोधात आठवले मैदानात

खासदारकीचा राजीनामा द्या, मग आमच्याशी बोलायला या

रामदास आठवले

रोहित वेमुला याच्या आत्महत्या प्रकरणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याची तयारी केली आहे. उद्या शनिवारी रात्री चेंबूर येथे पक्षाच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून, त्यात रविवारी राज्यव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केली जाणार आहे. आठवले यांनी हैदराबाद विद्यापीठात जाऊन आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु आधी भाजपचा पाठिंबा काढून घ्या, खासदारकीचा राजीनामा द्या, मग आमच्याशी बोलायला या, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतल्यामुळे त्यांची पंचायत झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 2:46 am

Web Title: ramdas athavale criticism on government
टॅग : Ramdas Athavale
Next Stories
1 अनुकंपा तत्त्वावरील शिक्षक भरती कंत्राटी पद्धतीने
2 ‘लोकसत्ता संपादक शिफारस’चे तिसरे नाटय़पुष्प..‘ढोलताशे’!
3 भरधाव गाडीची पाच जणांना धडक
Just Now!
X