News Flash

विदर्भच्या वादात रामदास आठवलेंची उडी

भाजपच्या भूमिकेचे समर्थन

Ramdas Athawale : तृतीयपंथीयांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठीच्या ट्रान्सजेंडर विधेयकाच्या मंजूरीसाठी मोदी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन यावेळी रामदास आठवले यांनी दिले.

भाजपच्या भूमिकेचे समर्थन

अखंड महाराष्ट्र की स्वतंत्र विदर्भ राज्य मागणीवरून निर्माण झालेल्या राजकीय वादात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली. स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी, असा ठराव मुंबईत बुधवारी झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर करून त्यांनी भाजपच्या भूमिकेचे समर्थन केले.

केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्यामुळे रामदास आठवले यांचा बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थिती सत्कार होणार होता; परंतु महाड येथील दुर्घटनेमुळे त्यांनी हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर पूर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीवरून राज्यात भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी असा सामना सुरू झाला आहे. सुरुवातीला शिवेसनेनेही भाजपविरोधात भूमिका घेतली होती, मात्र मुख्यमंत्र्यांच्या आपण अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत, या निवेदनानंतर त्यांनी माघार घेतली.

‘अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करू नका’

अहमदनगर जिल्ह्य़ातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दलित-आदिवासी अत्याचार प्रतिबंधक (अ‍ॅट्रॉसिटी) कायदा रद्द करावा, अशी मागणी केली होती. त्याला रामदास आठवले यांनी विरोध केला. हा कायदा रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 3:07 am

Web Title: ramdas athawale comment on independent vidarbha issue
Next Stories
1 लावण्यसम्राज्ञींचा ‘तोरा’ फक्त सौंदर्यस्पर्धापुरताच!
2 तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवर कोणती कारवाई?
3 सहज सफर : जंगलवाट नि धो धो धबधबा!
Just Now!
X