News Flash

‘आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा प्रयत्न उधळून लावू’

सर्व आरक्षण आर्थिक निकषावर करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास सर्व ताकदीनिशी तो हाणून पाडू.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

या देशात जाती आहेत, तोपर्यंत जातीवर आधारित आरक्षण राहणार. दलित, आदिवासी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आधी जातिव्यवस्था नष्ट करा, मग जातीआधारित आरक्षणाविरुद्ध बोला. सर्व आरक्षण आर्थिक निकषावर करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास सर्व ताकदीनिशी तो हाणून पाडू. जाती नष्ट  झाल्याशिवाय जातीआधारित आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मतावरिुद्ध शड्डू ठोकले आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीत या पुढील काळात आर्थिक निकषावर आरक्षण असावे, अशी भूमिका मांडली. त्यास आपला विरोध असल्याचे आठवले यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

दलित, आदिवासी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा; लिंगायत; ब्राह्मण आदी सवर्ण समाजातील आर्थिक दुर्बलांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे. त्यासाठी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा वाढवून ७५ टक्के करण्यात यावी. तसे झाल्यास सर्वाना आरक्षणाचा लाभ मिळून आरक्षणावरून होणारी भांडणे मिटतील असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 4:18 am

Web Title: ramdas athawale oppose reservation for economically weak families
Next Stories
1 ‘नीट’ परीक्षेचा अर्ज भरायचा की नाही?
2 ‘एमपीएससी’च्या सगळ्याच प्रक्रियांवरील स्थगिती कायम
3 परराज्यातील विद्यार्थ्यांची अडवणूक अवैध
Just Now!
X