News Flash

रामदास कदम यांच्या टंकलेखकाला अटक

महिन्याभरापूर्वी सावंतला विदर्भातील एका वाळू व्यावसायिकाचा फोन नंबर मिळाला.

प्रतिकात्मक छायाचित्र

व्यापाऱ्याला खंडणीच्या धमक्या

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या शासकीय बंगल्यावरील टंकलेखकाला शुक्रवारी मलबार हिल पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात बेडय़ा ठोकल्या. महेश सावंत असे या टंकलेखकाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्याने विदर्भातील एका व्यावसायिकाला कारवाईची भीती दाखवून दहा लाख रुपये मागितले होते. तसेच या व्यवहारात सावंत याने मंत्री कदम यांचे नाव वापरल्याने व्यावसायिक घाबरला होता. दरम्यान, सावंत याने कदम यांच्या बंगल्यावर काम करता करता असे प्रताप केले आहेत का, याबाबत मलबार हिल पोलीस तपास करत आहेत.

महिन्याभरापूर्वी सावंतला विदर्भातील एका वाळू व्यावसायिकाचा फोन नंबर मिळाला.  कदम यांचे नाव वापरून कारवाईची भीती दाखवली. कारवाई टाळण्यासाठी दहा लाख रुपये मागितले. या व्यावसायिकाने ही बाब कदम यांच्या कानावर घातल्याचे समजते; तर कदम यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाची माहिती मिळताच खातरजमा करण्यात आली. शुक्रवारी कदम यांच्या बंगल्यावरून त्याला अटक करण्यात आली. ९ मेपर्यंत पोलीस कोठडीत असलेल्या सावंतकडे याआधी कदम यांचे नाव वापरून खंडणी उकळली आहे का, तसा प्रयत्न केला आहे का याबाबत चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 3:22 am

Web Title: ramdas kadams typist arrested for extortion
Next Stories
1 झोपडपट्टीवासीयांना पुनर्वसनात पक्के घर
2 अधिसभेतून अधिकाऱ्यांना वगळले
3 राज्यातील सर्व शाळांमध्ये तक्रारपेटी बंधनकारक
Just Now!
X