मुंबई : येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची मुलगी रोशनी हिला महानगर दंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी जामीन मंजूर केला. येस बँक-डीएचएफएल गैरव्यवहारप्रकरणी ‘सीबीआय’ने ज्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे त्यात रोशनीचाही समावेश आहे.

सीबीआयने जूनमध्ये राणा आणि अन्य आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. परंतु भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ठेवण्यात आलेले आरोप न्यायालयाने रद्द केले होते. भ्रष्टाचाराच्या आरोपाअंतर्गत खटला चालवण्यासाठी मंजुरी आवश्यक आहे. ती घेण्यात ‘सीबीआय’ला अपयश आल्याने न्यायालयाने भ्रष्टाचाराचे आरोप रद्द केले होते. तसेच खटला विशेष न्यायालयातून महानगर दंडाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला होता. महानगर दंडाधिकाऱ्यांनी आरोपपत्र दाखल करून घेत अटक न झालेल्या आरोपींना हजर राहण्याचे आदेश दिले होते.