नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे ठाणे महापालिकेचे नगरसेवक रवींद्र फाटक शिवसेनेच्या वाटेवर आहेत. सोमवार २१ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन समर्थकांसह आपण शिवसेनेत प्रवेश करू, मात्र यासंदर्भात आपण उद्या सविस्तर बोलू असे त्यांनी सांगितले. त्यांच्या समवेत किमान सात नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करतील, असे बोलले जाते. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे एकीकडे ठाण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे, तर दुसरीकडे त्यांचा हा निर्णय म्हणजे नारायण राणे यांनाही मोठा धक्का मानला जात आहे. मात्र नारायण राणेंशी चर्चा करूनच आपण हा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत कणकवलीमध्ये त्यांचा अवघ्या ३५ मतांनी पराभव झाला होता.

सोमवार २१ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन समर्थकांसह आपण शिवसेनेत प्रवेश करू, मात्र यासंदर्भात आपण उद्या सविस्तर बोलू
रवींद्र फाटक, नगरसेवक