मुंबईतील दुसऱ्या जागेकरिता उत्सुकता आहे. काँग्रेसला २५ मतांची गरज असून, राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यास १० ते १२ मतांची आवश्यकता आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे इच्छुक असल्याची चर्चा असली तरी राणे यांनी इन्कार केला आहे. गेल्याच आठवडय़ात राणे यांनी नवी दिल्लीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. यामुळे राणे रिंगणात उतरणार अशी चर्चा सुरू झाली आहे. विधान परिषदेच्या जुलै महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत संधी मिळावी, असा राणे यांचा प्रयत्न असू शकतो.