05 March 2021

News Flash

शिवसेनेच्या विरोधात पाच ठिकाणी राणेंचे उमेदवार

रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व अन्य एका मतदारसंघांत उमेदवार उभे करणार आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

भाजप-शिवसेना युती झाली तरीही भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष राज्यातील पाच मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करणार आहेत. विशेष म्हणजे हे पाचही मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व अन्य एका मतदारसंघांत उमेदवार उभे करणार आहेत. ‘आपला पक्ष स्वतंत्र असून, पक्षाच्या वतीने उमेदवार उभे करणार आहोत, असे राणे यांनी सांगितले. प्रत्येक महसूल विभागात एक उमेदवार उभा केला जाईल. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला फार काही यश मिळणार नाही. ज्या काही जागा मिळतील त्या भाजपमुळे मिळतील, अशी पुष्टी राणे यांनी जोडली. भाजप आणि शिवसेना युतीचा निर्णय झाल्याच्या पाश्र्वभूमीवर राणे यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाली. आपली भूमिका त्यांच्याकडे स्पष्ट केल्याचेही राणे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 3:00 am

Web Title: ranes candidate in five places against shiv sena
Next Stories
1 उत्सवांतील दणदणाट : कायदा-सुव्यवस्थेची सबब देता कशी?
2 कलेला जनताजनार्दनाचा रेटा हवा – राज ठाकरे
3 प्रियंकांच्या चमूत महाराष्ट्रातील दोघांचा समावेश
Just Now!
X