अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर तिची हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भरतसिंग राठोड (२६) या नराधमास ठाणे जिल्हा न्यायालयाने शनिवारी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हत्या करण्याच्या उद्देशाने पळवून नेणे आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा आणि या चारही गुन्ह्य़ांसाठी २० हजारांचा दंड न्यायालयाने सुनावला. जिल्हा न्यायाधीश व्ही. के. गिरकर यांनी ही शिक्षा सुनावली.
मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवा भागात २ मार्च २०१२ मध्ये ही घटना घडली. दुपारी तीन वाजता शिकवणीसाठी घरातून बाहेर पडलेली मुलगी रात्री उशीरापर्यंत परत आली नाही
त्यावेळी भगतसिंग राहत असलेल्या इमारतीच्या मागील बाजूस एका गाठोडय़ामध्ये मुलीचा मृतदेह सापडला. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती पोलीसांनी भगतसिंगला अटक केले होते. सरकारी वकील म्हणून अशोक खामकर यांनी काम पाहिले.
२२ साक्षीदारांची तपासणी खटल्यात करण्यात आली. त्यानंतर भगतसिंग यास दोषी ठरवून न्यायालयाने दुहेरी जन्मठेप आणि पाच हजारांची शिक्षा सुनावली.