News Flash

आधारकार्ड काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडून पालिका शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग

गोवंडी येथील पालिकेच्या शाळेत आधारकार्ड काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली. त्यामुळे आधारकार्डाचे काम सुरू असलेल्या पालिका शाळांमध्ये सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले

| January 22, 2013 03:27 am

गोवंडी येथील पालिकेच्या शाळेत आधारकार्ड काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली. त्यामुळे आधारकार्डाचे काम सुरू असलेल्या पालिका शाळांमध्ये सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
विविध ठिकाणच्या पालिका शाळांमध्ये सध्या आधारकार्ड देण्याचे काम सुरू आहे. गोवंडी येथील पालिका शाळेमध्ये गेल्या आठवडय़ापासून हे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शाळेत नागरिकांची वर्दळ वाढली आहे.
शाळेत आलेल्या एशाच एका अज्ञात इसमाने शाळेतील मुलींच्या शौचालयात जाऊन विद्यार्थिनीचा विनयभंग केला. त्यामुळे पालकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. आधारकार्डाचे काम करणाऱ्या संस्थांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहेत.
दरम्यान, यापूर्वीही या शाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला होता. त्यामुळे मुख्याध्यापकांची बदली करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 3:27 am

Web Title: rape by who came for getting the aadhar card in school
Next Stories
1 मुंबई बकाल आणि नियोजनशून्य!
2 महिला सहकाऱ्याची बलात्कार करून हत्या करणाऱ्या तरुणाला जन्मठेप
3 पोलिसांनी उधळला अपहरणाचा कट
Just Now!
X