29 September 2020

News Flash

१६ वर्षीय मुलीवर ठाण्यात बलात्कार

एका आरोपीला अटक, दुसरा फरार ठाण्यात कोपरी येथील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी येथील घोडबंदर रोडवरील ओवळा परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्षीय

| March 31, 2013 02:55 am

एका आरोपीला अटक, दुसरा फरार
ठाण्यात कोपरी येथील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी येथील घोडबंदर रोडवरील ओवळा परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीवर दोन जणांनी बलात्कार केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. मनिष ऊर्फ  माशाल गंगाराम शिंगे (२३) असे आरोपीचे नाव आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोड येथील वाघबीळ भागातील १६ वर्षीय मुलगी ओवळा येथे जात असताना आरोपी मनिष आणि त्याचा साथीदार धीरज कोल्हेकर याने तिला अडवले. तिचा मोबाईल हिसकावून घेतला. यानंतर त्यांनी तेथील तलाव परिसरातील एका खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याबाबतची तक्रार या मुलीने कासारवडवली पोलीस ठाण्यात केल्यावर पोलिसांनी आरोपी मनिषला अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2013 2:55 am

Web Title: rape on 16 years girl in thane
टॅग Arrest,Thane
Next Stories
1 ठाण्यातील बिलबॉंग शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस
2 व्हिवा लाऊंज ‘वन्स मोअर’
3 स्पर्धा परीक्षांसाठी यशाचा ध्यास महत्त्वाचा!
Just Now!
X