News Flash

अ‍ॅण्टॉप हिल येथे पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्काराची घटना मंगळवारी अ‍ॅण्टॉप हिल येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी कबरार उर्फ छोटू त्रिवेदी (२४) या टेम्पो चालकाला अटक केली आहे.

| April 26, 2013 04:49 am

पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्काराची घटना मंगळवारी अ‍ॅण्टॉप हिल येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी कबरार उर्फ छोटू त्रिवेदी (२४) या टेम्पो चालकाला अटक केली आहे.
 अ‍ॅण्टॉप हिल येथील महात्मा गांधी नगर येथील चाळीत ही पाच वर्षांची पिडीत मुलगी राहते. मंगळवारी संध्याकाळी तिच्या शेजारील खोलीत राहणाऱ्या त्रिवेदीने तिला बिस्किट देण्याचे आमिष दाखवून तिला आपल्या खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. बुधवारी सकाळी या मुलीला त्रास झाला आणि रडायला लागली. आईने चौकशी केल्यावर तिने आईला रात्री घडलेली घटना सांगितली.  याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी त्रिवेदी याला विचारणा केल्यावर तो पळून गेला. याप्रकरणी वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर त्रिवेदीवर विनयभंग,  बलात्कार आणि बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर फरार झालेल्या त्रिवेदी याला बुधवारी संध्याकाळी माहिम येथून अटक केली.
दरम्यान, दुसऱ्या एक घटनेतष एका अल्पवयीन मुलीवर सावत्र बापच दोन वर्षे बलात्कार करीत असल्याचा प्रकार मुंब्रा परिसरात उघडकीस आला आहे. या संदर्भात पिडीत चौदा वर्षीय मुलीने बुधवारी सायंकाळी मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 4:49 am

Web Title: rape on five years girl at antop hill
Next Stories
1 अबू जुंदाल म्हणतो, कसाबच्या कोठडीत ठेवू नका!
2 डोंबिवलीत अनधिकृत इमारतींचा पाणी, वीजपुरवठा पालिकेकडून खंडित
3 कलाकारांना खेचण्याची चित्रपट सेनांमध्ये चढाओढ
Just Now!
X