25 September 2020

News Flash

डोंबिवलीत ‘रिक्षावाल्या काका’कडून चिमुरडीवर बलात्कार

राजेश बामणे या शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकाने चार वर्षांंच्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना मंगळवारी उजेडात आली. या मुलीच्या पालकांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात

| December 12, 2012 04:11 am

राजेश बामणे या शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकाने चार वर्षांंच्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना मंगळवारी उजेडात आली. या मुलीच्या पालकांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात सायंकाळी दाखल केलेल्या गुन्ह्य़ावरून या रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे. डोंबिवलीत होत असलेल्या अत्याचार, छेडछाडीच्या अशा घटनांमुळे येथील पालकवर्ग हादरून गेला असून, अशा घटनांबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश बामणे हा मुलांना शाळेत आपल्या रिक्षातून ने-आण करण्याचे काम करतो. काही दिवसांपूर्वी त्याने एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असलेल्या चार वर्षांच्या मुलीला तिच्या घरी न सोडता जुन्या डोंबिवलीतील यशवंत नगरमधील सीताराम निवास या चाळीतील आपल्या घरी नेले. तेथे तिला मारहाण करून त्याने तिच्यावर बलात्कार केला.
या मुलीला त्रास होऊ लागल्याने तिने पालकांना हा प्रकार सांगितला. मुलीची बदनामी नको म्हणून पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली नाही. पण, मुलीचा त्रास वाढू लागल्याने पालकांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मंगळवारी रात्री त्याला अटक करण्यात आली.      

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2012 4:11 am

Web Title: rape on girl child by autorickshaw driver
Next Stories
1 अल्पवयीन मुलीचे एक महिन्यापूर्वी अपहरण
2 मावळता सूर्य पाहण्याच्या नादात कळव्यातील अपघात
3 शरद पवार रुग्णालयातून घरी
Just Now!
X