मुंबई : मालवणीत एका २० वर्षीय मतीमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मालवणी गेट क्रमांक ७ येथे राहणाऱ्या पीडित मुलीचे आई वडील भाजी विक्रेते आहेत. शुक्रवारी ही मुलगी घराजवळ खेळत असताना एका राजू नावाच्या मुलाने तिला आपल्यासोबत खेळायला बोलावले. नंतर तिला आपल्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.