04 March 2021

News Flash

सहाय्यक अभिनेत्रीवर बलात्कार, स्पॉटबॉयला अटक

एका सहाय्यक अभिनेत्रीवर स्पॉट बॉयकडूनच बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुस्तफा मकसूनद अली खान (२३) याला अटक केली आहे.

| February 26, 2013 03:12 am

एका सहाय्यक अभिनेत्रीवर स्पॉट बॉयकडूनच बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुस्तफा मकसूनद अली खान (२३) याला अटक केली आहे.
चैताली (नाव बदलेले) ही २२ वर्षीय तरूणी बॉलीवूडमध्ये अभिनेत्री बनण्यासाठी आली होती. तिच्या पतीचे निधन झाल्याने तिला पैशांची गरज होती. कुंदन यादव या  परिचयाच्या व्यक्तीने तिला मुस्तफा अली खानकडे  पाठविले. आपण हिंदी चित्रपटांना अर्थ पुरवठा करणारे फायनान्सर आहोत, अशी बतावणी करून त्याने चैतालीला गोरेगावच्या कार्यालयात ऑडिशनसाठी बोलावले. १० डिसेंबरला ती खानला भेटायला गेली. तिथे काम देऊन नंतर ५० हजार रुपये देतो असे सांगून तिच्याशी शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. मात्र नंतर पैसे न देता तो टाळाटाळ करू लागला. आपली फसवणूक होत आहे असे लक्षात आल्यावर तिने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी रविवारी मुस्तफा खानला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2013 3:12 am

Web Title: rape on supporting actress arrest to spot boy
Next Stories
1 व्याजाचे आमीष दाखवून १६ कोटींची फसवणूक
2 बांगलादेशीयांकडून मुंबई पोलिसांना मारहाण
3 नवी मुंबई बिल्डर हत्याप्रकरणी गुन्हेगारी जगताकडे संशय
Just Now!
X