News Flash

धक्कादायक! मावशीवरील बलात्काराच्या व्हिडीओची भीती दाखवत अल्पवयीन भाचीवर बलात्कार

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे

प्रतिकात्मक छायाचित्र

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी २६ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने मुलीच्या मावशीवरही बलात्कार केला होता. बलात्कार करत असताना त्याने त्याचं व्हिडीओ शूटिंग केलं होतं. या व्हिडीओची धमकी देत त्याने महिलेच्या १७ वर्षीय अल्पवयीन भाचीवरही बलात्कार केला. हे व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी आरोपीने दिली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अल्पवयीन मुलगी सध्या गर्भवती असल्याचंही ते म्हणाले आहेत.

आरोपीने लग्नाचं अमिष दाखवत २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला होता. यावेळी त्याने तरुणीच्या नकळत व्हिडीओ शूट केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, एका पार्टीत आरोपीची दोघींशी ओळख झाली होती. यावेळी त्याने आपलं नाव आशिष दुबे असल्याचं सांगत खोटी ओळख करुन दिली होती.

आरोपी मुळचा आसामचा रहिवासी असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी बलात्कार तसंच पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला खार येथून अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2020 11:45 am

Web Title: rape on woman and niece in mumbai accused arrested sgy 87
Next Stories
1 जरा अतिउत्साही कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना आवर घाला, शिवेंद्रराजे संतापले
2 ही तर भक्तांची चमचेगिरी, नरेंद्र मोदींची काही चूक नाही – संजय राऊत
3 छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी तात्काळ राजीनामे द्यायला हवे – संजय राऊत
Just Now!
X