महापौर, महापालिका आयुक्तांचा दावा

मुंबई : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दुपारी पालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. तर महापौर किशोरी पेडणेकर व महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी हिंदमाता परिसरातील सखल भागामध्ये संयुक्त भेट देऊन पाण्याचा निचरा वेगाने करण्यासाठी येत असलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे पावसाळी पाण्याचा निचरा जलदगतीने व प्रभावीपणे झाल्याचा दावा महापौरांनी के ला.

हिंदमाता येथील पाणी निचरा करणारी वाहिनी ब्रिटानिया उदंचन केंद्राला जोडण्याचे अवघे १०० मीटरचे काम बाकी असून हे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे पाण्याचा निचरा आणखी जलद गतीने होण्यास मदत होईल, असा दावा हिंदमाता येथे पाहणी के ल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौरांनी के ला. मुंबईतील एकंदर स्थिती पाहता जिथे पाणी साचले, अशा ठिकाणी भेटी देऊन तेथील नेमकी कारणे समजून घेऊन त्यावर योग्य त्या अतिरिक्त उपाययोजना करण्यात येत असल्याचेही महापौरांनी  सांगितले.

मुंबईत पावसाचा जोर वाढल्यानंतरही रस्ते वाहतुकीमध्ये खंड पडलेला नाही. हिंदमाता येथे अतिशय सखल भागामध्ये पाणी साचले तरी परिसरासाठी यंदा बांधलेल्या रॅम्पमुळे वाहतुकीला दिलासा मिळाला आहे, असा दावा महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल प्रसारमाध्यमांशी बोलताना के ला. जोरदार पाऊस व भरतीच्या वेळी हिंदमाता परिसरात साचणारे पाणी हे सेंट झेवियर्स मैदान व प्रमोद महाजन उद्यानातील भूमिगत टाक्यांमध्ये साठविण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या भूमिगत टाक्यांना जोडणारम्या भूमिगत वाहिन्या टाटा मिल परिसरातून नेण्यासाठी ३१ मे २०२१ रोजी परवानगी प्राप्त झाली आहे. यामुळे भूमिगत जलवाहिन्या टाकण्याच्या कामाला आता वेग दिला जात आहे. ते काम पूर्ण झाले की हिंदमाता परिसराला मोठा दिलासा मिळेल, असेही चहल यांनी सांगितले.