News Flash

‘लोकसत्ता गप्पा’त आज रत्ना पाठक-शाह 

 हिंदी चित्रपट, टेलिव्हिजन माध्यम आणि रंगभूमीवर गेली ३५ वर्षांहून अधिक काळ रत्ना कार्यरत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

परखड भूमिका घेणाऱ्या कलाकार म्हणून ज्ञात असणाऱ्या तसेच हिंदी, इंग्रजी आणि गुजराती रंगभूमीसह मोठा पडदा गाजविणाऱ्या अभिनेत्री रत्ना पाठक-शाह यांच्याशी आज, रविवारी   ‘लोकसत्ता गप्पा’ची संवाद मैफल रंगणार आहे. पडद्यावरील भूमिकांपलीकडे त्यांचे माणूसपण, त्यांची वैचारिक जडणघडण, सामाजिक भूमिका या मंचावरून समोर येणार आहे. अभिनेते-रंगकर्मी मकरंद देशपांडे त्यांच्याशी संवाद साधतील.

हिंदी चित्रपट, टेलिव्हिजन माध्यम आणि रंगभूमीवर गेली ३५ वर्षांहून अधिक काळ रत्ना कार्यरत आहेत. जवळपास तीन पिढय़ा त्यांच्या अभिनयकौशल्याचा आनंद घेत आहेत. ऐंशीच्या दशकात आलेल्या समांतर चित्रपटांच्या लाटेत त्यांच्या भूमिका गाजल्या. हिंदीबरोबरच इंग्रजी, गुजराती रंगभूमीवरही त्यांनी अनेक भूमिका गाजवल्या आहेत.

सहप्रायोजक : झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (एस.आर.ए) आणि

एम. के. घारे ज्वेलर्स

बँकिंग पार्टनर : ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2020 1:24 am

Web Title: ratna pathak shah today in loksatta gappa abn 97
Next Stories
1 नाणारविषयी शिवसेनेच्या भूमिकेबाबत संभ्रम
2 उगवत्या वक्त्यांना नोंदणीसाठी मुदतवाढ
3 स्त्रीवादी जाणीव स्वानुभवातूनच  – शांता गोखले
Just Now!
X