24 January 2021

News Flash

रत्नागिरी, सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा निश्चितीच्या सूचना 

वैद्यकीय महाविद्यालयासाठी रत्नागिरीत जागेची चाचपणी सुरू

(संग्रहित छायाचित्र)

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने जागा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी दिल्या.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भातील आढावा बैठक मंत्रालयात गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख म्हणाले की, भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी किमान सलग २० एकर जागा असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जागा निश्चित करून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करावी. यानंतरच वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठीचा आवश्यक असलेला प्रस्ताव तयार केला जाईल.

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री सामंत म्हणाले की, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. त्यापैकी रायगड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबतचे काम सुरू असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा प्रशासनाने किमान २० एकर जागा निश्चित करून वैद्यकीय शिक्षण विभागास त्वरित कळवावे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी रत्नागिरीत जागेची चाचपणी सुरू आहे.

राजापूर तालुक्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारावे, अशी मागणी सामाजिक संघटनांनी सामंत यांच्याकडे केली होती. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी महाविद्यालयाची गरज आहे, याकडे सामंत यांचे लक्ष वेधण्यात आले होते. बैठकीस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे खासदार अरविंद सावंत, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने  उपस्थित होते.

वैद्यकीय महाविद्यालयासाठी किमान सलग २० एकर जागा आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने जागा निश्चित करून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करावी.

– अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2020 12:18 am

Web Title: ratnagiri sindhudurg medical college site instructions abn 97
Next Stories
1 पदोन्नती, रिक्तपदे भरण्याबाबत मंत्रालयात मासिक आढावा
2 मनोरंजन क्षेत्राबाबतचे धोरण लवकरच निश्चित करणार
3 राजकीय स्वार्थासाठी केंद्राकडून सीबीआयचा वापर
Just Now!
X