रवी पुजारी टोळीचा मुख्य सूत्रधार असलेल्या युसूफ काद्री उर्फ युसूफ बचकाना याला मुंबई गुन्हे शाखेने कर्नाटकमधील तुरुंगातून ताब्यात घेतले आहे. चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्यावरील हल्ल्याच्या कटात युसूफ बचकानाचे नाव समोर आले होते. बचकाना कर्नाटक तुरुंगात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत होता. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात महेश भट्ट यांच्यावर हल्ला करण्याची योजना गुंड रवी पुजारीने आखली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2015 4:26 am
Web Title: ravi pujari gang