बॅंक ग्राहकांना खात्यामधील शिल्लक रकमेची माहिती मिळविण्यासाठी रिझव्‍‌र्ह बॅंकेने कोणतेही ‘मोबाइल अ‍ॅप’ विकसित केलेले नाही, अशी माहिती ‘आरबीआय’ने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ‘व्हॉट्स अ‍ॅप’ या सोशल मिडियावरून या संदर्भातील संदेश फिरत असल्याच्या पाश्र्वभूमीवर ‘आरबीआय’ने हे स्पष्टीकरण केले आहे.
ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यातील शिल्लक रकमेची माहिती आता एका दूरध्वनी क्रमांकावर मिळू शकेल, असा दावा करणारा संदेश ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर फिरतो आहे. या अ‍ॅप्लिकेशनवर ‘आरबीआय’चे बोधचिन्ह तसेच अनेक बँकांची नावे असून त्यापुढे चौकशी करण्यासाठीचा दूरध्वनी क्रमांकही आहे. मात्र ‘आरबीआय’ने अशी माहिती देणारे कोणतेही अ‍ॅप्लिकेशन तयार केले नसून  ग्राहकांनी स्वत:च्या जबाबदारीवर त्याचा वापर करावा, असे  स्पष्ट करण्यात आले आहे.