News Flash

भाजपच्या स्थापनादिनी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचा- फडणवीस

भारतीय जनता पक्षाच्या स्थापनादिनी सोमवारी २५ लाख नागरिकांपर्यंत सेवाकार्य पोचविण्याचा संकल्प

संग्रहित छायाचित्र

भारतीय जनता पक्षाच्या स्थापनादिनी सोमवारी २५ लाख नागरिकांपर्यंत सेवाकार्य पोचविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले.

राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील भाजप नगरसेवकांशी त्यांनी ‘ऑडिओ ब्रीज’च्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले, करोनाविरुद्ध लढताना टाळेबंदीच्या काळात सामाजिक अंतर ( सोशल डिस्टन्सिंग) ठेवण्याचे आपण कसोशीने पालन करावे. पण या काळात गरजूंपर्यंत पोहोचणे, हे आपले कर्तव्य आहे. विविध प्रकारच्या सेवा देताना आपण सुमारे २२ लाख नागरिकांपर्यंत आज पोहोचलो आहोत. पण स्थापनादिनी सोमवारी २५ लाख नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे आपले उद्दिष्ट असले पाहिजे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 12:43 am

Web Title: reach out to more and more people on bjps day fadnavis abn 97
Next Stories
1 विद्यापीठ, महाविद्यालयीन, परीक्षांबाबत दोन दिवसांत निर्णय?
2 मुंबईत वरळी, प्रभादेवीत सर्वाधिक रुग्ण
3 शेतकरी, ग्राहकांची व्यापाऱ्यांकडून लुबाडणूक
Just Now!
X