एखादा प्रवासी विनातिकिट रेल्वेतून प्रवास करताना आढळला तर पूर्वी त्याला जबर दंड किंवा शिक्षा होत असे. परंतु अशा प्रवाशांना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी खूशखबर दिली आहे. रेल्वेमधून जर तुम्ही विनातिकिट प्रवास करात असाल तर दंड भरण्याऐवजी तुम्हाला धावत्या रेल्वेतच तिकिट काढण्याची सुविधा मिळणार आहे. प्रारंभी ही सुविधा लखनऊ मेल, गरीब रथ, अर्चना सुपरफास्ट, राजधानी सुपरफास्ट या रेल्वेतून देण्यात येईल. सध्यातरी प्रभूंच्या या निर्णयाचे लोकांकडून स्वागत होत असले तरी या सुविधेमुळे प्रवाशांचा मनस्ताप कमी होणार की रेल्वेची डोखेदुखी वाढणार हे लवकरच कळेल. यासंदर्भात आम्ही वाचकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया येथे देत आहोत.
नाही. कारण रेल्वेत टीसी एक-दोनच असतात आणि विनातिकीट प्रवास करणारे जास्त असतात. टीसी सर्व प्रवांशापर्यंत पोहचू शकत नाही. यामुळे रेल्वेत फुकट्यांची संख्या वाढेल आणि रेल्वे तोट्यात जाईल. – उमेश महाले
ही नवी पद्धत पुर्णता चूकीची आहे. विना तिकीट वाल्यांसाठी वेगळा डबा ठेवावा व त्यांच्याकडून तिकीटाच्या दीडपट रक्कम किंवा तिकीट व ५० रुपये जादा घ्यावेत. अन्य डब्यामध्ये विना तिकीट प्रवाशाकडून प्रचलित नियमानुसार दंड वसूल करावा. – नरेंद्र कदम
हो. थोडा अधिक दंड आकारून प्रवाशांना तिकिट द्यावे. परदेशात अशी सुविधा आहे. – संदिप यादव
अगदी योग्य निर्णय. यामुळे टीसींची संख्या वाढेल. सीटचा काळाबाजारही थांबेल. – दीपक देसाई
फक्त सुपरफास्ट, दुरोन्तो, राजधानी, ए/सी वर्गा साठी ही सोय असावी कारण ही सेवा घेणारे शक्यतो ‘फ्री’ची अपेक्षा ठेवत नाहित. – गुरू राजुरकर
जर ट्रेनमध्ये त्याच दराने आणि तेही पकडलं तर टिकिट मिळणार असेल तर प्रवासी टिकिट खिड़कीवर रांग का लावतील? – संतोष भोसले
काहीतरी दंड असावा, नाहीतर सगळेच आपली बॅग उचलतील आणि प्रवासाला निघतील. विनातिकिट प्रवाशांना हाताळणं टीसीच्या हाताबाहेर जाईल. – रमेश मोरे
हो. टीसीचे अच्छे दिन आ गये, कमाई तौ अब ज्यादा होगी. – गोपाळ देशमुख
शंभर टक्के चुकीचा निर्णय ठरेल. टिकिट खिडक्या वाढवा. दंड आवश्यक आहे. टीसीने लाच घेतल्यास त्याच्यासाठीसुद्धा दंडाची तरतुद असावी. – मुकुंद घाटे
आरक्षणही जनरल होऊन जाईल. ही चांगली कल्पना नाही. – जावेद अंसारी
विनातिकिट प्रवाशांना ताबडतोब दुप्पट रक्कम आकारून तिकिट द्यायला हवं. – देवेंद्र चव्हाण