रेडी रेकनरच्या दरात राज्यात सरासरी सात टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या नव्या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारपासून राज्यात सुरू झाली.
दरवर्षांच्या सुरुवातीला १ जानेवारी रोजी नवीन रेडी रेकनरचे दर लागू होतात. मात्र, यंदा हे दर नवीन आर्थिक वर्षांच्या पहिल्या दिवशी जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने डिसेंबरमध्ये घेतला होता. त्यानुसार महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी विधिमंडळात रेडी रेकनरच्या नव्या दराची घोषणा केली. राज्यात सरासरी सात टक्के रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्यात आली. गेल्या वर्षी ही दरवाढ सरासरी १४ टक्के होती. पुणे विभागात सर्वाधिक ११ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. मुंबईत सात टक्के, कोकणात पाच टक्के वाढ करण्यात आली असून नाशिक विभागात सात टक्के, औरंगाबाद विभागात सहा टक्के, अमरावती विभागात आठ टक्के, तर नागपूर विभागात सहा टक्के दरवाढ करण्यात आली आहे. विविध शहरांतील रेडी रेकनरची वाढ खालील तक्त्यामध्ये दिलेली आहे.
ready-recknor-final