मुले असोत की वृद्ध प्रत्येकाच्या खाण्याच्या गरजा या त्या-त्या वयानुसार वेगवेगळ्या असतात. हे लक्षात घेऊनच वैद्य प. य. खडीवाले यांनी सिद्ध केलेल्या ‘पूर्णब्रह्म’ या पाककृतींच्या संग्रहाचे प्रकाशन सोमवारी, २९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता मांटुगा येथील यशवंत नाटय़मंदिरात होणार असून, स्वत: वैद्य खडीवाले या वेळी वाचक-प्रेक्षकांच्या खाद्यविषयक प्रश्नांना उत्तरे देणार आहेत.
चारशेपेक्षा जास्त पाककृती असणाऱ्या ‘पूर्णब्रह्म’मध्ये विद्यार्थी, युवक, स्त्रिया, श्रमिक, नोकरदार, वृद्ध आणि खेळाडू असे सात विभाग असून वयानुसार आणि व्यवसायाच्या गरजेनुसार आवश्यक खाद्यपदार्थाच्या पाककृती त्यात समाविष्ट आहेत. सोमवारी संध्याकाळी ६ वाजता होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्यात स्वत: वैद्य खडीवाले प्रेक्षकांच्या शंकांचे निरसन करतील. या संग्रहाची किंमत ५० रुपये असून तो ३० जूनपासून सर्वत्र उपलब्ध असेल. कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.