26 September 2020

News Flash

राज्यात गेल्या १० वर्षांतील विक्रमी कापूस खरेदी

आतापर्यंत ११,०२९.४७ कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत.

संग्रहित छायाचित्र

राज्यात करोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असूनही पणन विभागाने विक्रमी २१८.७३ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. गेल्या १० वर्षांत झाली नाही अशी कापसाची विक्रमी खरेदी झाल्याचे पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी एका सादरीकरणाद्धारे सांगितले.

या कापूस खरेदीचे एकूण मूल्य ११,७७६.८९ कोटी रुपये असून आतापर्यंत ११,०२९.४७ कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत. तसेच सीसीआयने ३० सप्टेंबर २०२० पर्यंत एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी करणार असल्याचे घोषित केले आहे.

राज्यात सीसीआय व राज्य कापूस पणन महासंघाने कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावापूर्वी अनुक्रमे ९१.९० व ५४.०३ लाख क्विंटल कापूस खरेदी. अशा प्रकारे एकूण १४५.९३ क्विंटल कापूस खरेदी केली.

कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे कापसाचे बाजारातील दर हमीपेक्षा कमी असल्यसामुळे, शेतकऱ्यांचा कल, शासकीय खरेदी केंद्रावर विकण्याचा होता. त्यानुसार शासकीय खरेदी नियोजन करून कोव्हिड-१९ च्या काळात सीसीआय व कापूस पणन महासंघाने आजपर्यंत अनुक्रमे ३५.७० व ३६.७५ लाख याप्रमाणे ७२.४५ लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. राज्यातील शासकीय व खासगी अशी एकूण खरेदी ४१८.८ लाख क्विंटल झाली असून वास्तविक पाहता ४१० लाख क्विंटल कापूस खरेदी अपेक्षित होती. एकूण ८ लाख ६४ हजार ७२ शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 12:02 am

Web Title: record purchase of cotton in the last 10 years in the state abn 97
Next Stories
1 टाटापेक्षा अदानीची सौरऊर्जा महाग का?
2 ऑगस्टपासून महाविद्यालयांचे ऑनलाइन वर्ग भरवण्याची तयारी
3 व्यंकय्या नायडू चुकीचं वागले नाहीत – संजय राऊत
Just Now!
X