News Flash

गुड न्यूज! मुंबईत करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्के

मागील ४८ तासांमध्ये ७० रुग्णांचा मृत्यू

मुंबईत करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्के झाले आहे. आज ९६९ नवे करोना रुग्ण मुंबईत आढळले आहेत. सध्याच्या घडीला मुंबईत २२ हजार ८२८ करोना अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर मुंबईत करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५ हजार ४०२ झाली आहे. ४८ तासांमध्ये ७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

देशाच्या एकूण करोनाग्रस्तांची संख्येचा विचार केला तर महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे. देशभरात करोनाग्रस्तांची संख्या ९ लाखांवर गेली आहे. यापैकी २ लाख ५० हजारांच्यावर रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातही मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. मात्र अॅक्टिव्ह रुग्णांचा विचार केला तर मुंबईपेक्षा ठाण्याचे प्रमाण अधिक झाले आहे. दरम्यान मुंबईकरांसाठी चांगली बातमी ही की मुंबईतील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात मुंबईचा रिकव्हरी रेट हा ७० टक्के इतका झाला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 10:07 pm

Web Title: recovery rate stands at 70 percent in mumbai scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 आगरकरांच्या जयंतीला टिळकांचा फोटो, भाजपाचे गोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत
2 वसई-विरार पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर मनसेकडून घोषणाबाजी, शिवीगाळ
3 वरवरा राव यांना तळोजा कारागृहात चक्कर, जेजे रुग्णालयात केले दाखल
Just Now!
X