करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्यातील आरोग्य यंत्रणेवर कामाचा तणाव आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या रुग्णालयातही डॉक्टर, नर्स आणि वॉर्डबॉय यांना रात्रंदिवस काम करावं लागत आहे. याचसाठी मुंबई महापालिका प्रशासनाने ११४ परिचर कक्ष म्हणजेच वॉर्ड बॉयची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या जागांसाठीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून…१७ एप्रिल २०२० पूर्वी पोस्ट किंवा ईमेल आयडीवर अर्ज पाठवण्याचं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे.

या पदासाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास असून १८ ते ५७ हजार इतका पगारही मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी महापालिकेच्या http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावरुन अर्जाचा नमुना डाऊनलोड करायचा आहे. सर्व नियम आणि अटी वाचल्यानंतर अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF Format मध्ये अर्जासह mcgm.wardboy@mcgm.gov.in या ईमेल आयडीवर पाठवायच्या आहेत. ज्या उमेदवारंना ईमेल करणं शक्य नसल्यास पोस्टाने किंवा महापालिकेच्या मुख्यालयातील गेट क्रमांक ७ या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या बॉक्समध्ये १७ एप्रिल संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पाठवण्याचं आवाहन पालिकेने केलं आहे.

Dates of 299 exams of Mumbai University summer session announced Mumbai
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील २९९ परीक्षांच्या तारखा जाहीर; दोन लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षार्थी
job opportunity in indian coast guard
नोकरीची संधी : इंडियन कोस्ट गार्डमधील संधी
Nashik Citylink bus
परीक्षा काळातच नाशिकची सिटीलिंक बससेवा पुन्हा ठप्प
Director General of Police Rashmi Shukla will get a tenure of two years
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांचा कालावधी मिळणार!

उमेदवारांनी लक्षात ठेवायच्या महत्वाच्या गोष्टी –

  • शैक्षणिक पात्रता – दहावी पास
  • वेतन – १८ ते ५७ हजार
  • येथे पाठवा अर्ज – mcgm.wardboy@mcgm.gov.in
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – १७ एप्रिल २०२०