25 November 2020

News Flash

महापारेषणमध्ये ८,५०० पदांची भरती

तांत्रिक संवर्गातील ६७५० पदे व अभियंता संवर्गातील १७६२ पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे

(संग्रहित छायाचित्र)

ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत सुमारे ८५०० तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.

तांत्रिक संवर्गातील ६७५० पदे व अभियंता संवर्गातील १७६२ पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे. या भरती प्रक्रियेत आय.टी.आय. उत्तीर्ण, अभियांत्रिकी पदवीधारकांना सहभागी होता येईल. यंत्रचालक व तंत्रज्ञ संवर्गाचे एकत्रीकरण करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यामुळे कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 12:36 am

Web Title: recruitment of 8500 posts in mahatrans abn 97
Next Stories
1 प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याच्या भूमिकेला प्रतिष्ठितांचा पाठिंबा
2 मुखपट्टीविना फिरणाऱ्या८२ हजार जणांवर बडगा
3 कोविड योद्धे वेतनाच्या प्रतीक्षेत
Just Now!
X