News Flash

मुंबईत रद्द केलेल्या सात हजार टॅक्सी परवान्यांचे फेरवाटप

मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात टॅक्सी वाहतुकीत सुधारणा व्हावी म्हणून शासन प्रयत्न करीत आहे.

| November 20, 2013 06:22 am

मुंबईत रद्द केलेल्या सात हजार टॅक्सी परवान्यांचे फेरवाटप

मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात टॅक्सी वाहतुकीत सुधारणा व्हावी म्हणून शासन प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून रद्द करण्यात आलेल्या सात हजार ८४४ परवान्यांचे वाटप फोन फ्लीट टॅक्सीसाठी निविदा पद्धतीने करण्यात येणार आहे. महिला चालक टॅक्सीसाठी १०० परवाने राखीव असून त्यासाठीच्या किमान बोली शुल्कात मोठी सूट देण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी घेतला. महिला चालक टॅक्सीसाठी हे शुल्क एक लाख ५० हजार रुपये इतके तर इतर लायसन्स धारकासाठी हे मूल्य तीन लाख रुपये असे राहील.
मुंबईतील रद्द टॅक्सी परवाने एकूण १९ हजार ६८७ असून, यापैकी २०१० मध्ये एसएमएस टॅक्सीकॅब या कंपनीला चार हजार परवाने लिलावाने वाटप केले होते. त्यामुळे सध्या १५ हजार ६८७ परवाने उपलब्ध असून, यापैकी ५० टक्के म्हणजे सात हजार ८४४ परवाने हे काळ्या-पिवळ्या टॅक्सीसाठी फेरवाटप करण्यात येतील. हे परवाने वितरित करताना प्रत्येक निविदाकारास किमान १०० किंवा कमाल २५०० परवान्यांकरिता बोली करता येईल.
२० जानेवारी २०१० रोजी चार हजार परवाने फोन फ्लीट टॅक्सी योजनेंतर्गत देण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर १४ ऑगस्ट २०१३ रोजी एका अधिसूचनेन्वये हरकती व सुचना मागविण्यात आल्या होत्या. त्याला अनुसरून अंतिम नियमावली तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2013 6:22 am

Web Title: redistribution of taxi license in mumbai
Next Stories
1 शालेय बसची सक्ती; पालक, विद्यार्थी वेठीस
2 चारुदत्त देशपांडे आत्महत्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल
3 शिक्षण द्यावे की तणावात जगावे
Just Now!
X