डिझेलचे दर वाढल्याचे कारण पुढे करत खासगी दुध डेअऱ्यांनी दुधाच्या किंमतीत वाढ केली. मात्र, आता डिझेलचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे दुध डेअऱ्यांनी दुधाचे दर कमी करावेत, या मागणीसाठी ठाणे शहर दुग्धव्यावसायिक कल्याणकारी संस्थेने रविवारी ठाणे स्थानक परिसरात स्वाक्षरी मोहीम राबविली. सुमारे साडेसातशेहून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी करून या मोहिमेला प्रतिसाद दिला आहे. शासनाने दरवाढ तसेच कमिशनबाबत कोणतेही नियम केलेले नाहीत. गेल्यावर्षी सलग तीनदा शेतकऱ्यांना भाव वाढ दिल्याने आणि डिझेलचे दर वाढल्याने खासगी दुध डेअऱ्यांनी दुधाचे दर सहा ते सात रूपयांनी वाढविले. यंदा शेतकऱ्यांनी दुधाचे भाव तीन ते चार रूपयांनी कमी करण्यात आले. याशिवाय डिझेलचे दर सहा ते सात रुपयाने कमी झाले आहेत. असे असतानाही खासगी डेअऱ्या दुधाचे दर कमी करत नाहीत, असे संस्थेचे सहसचिव पांडुरंग चोडणेकर म्हणाले.