राज्यात करोना संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर करोनावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर सारख्या औषधांच्या किं मती कमी करण्याचे निर्देश अन्न व  औषध प्रशासनाने उत्पादक कं पन्यांना दिले आहेत.

या औषधाची किरकोळ किं मत हजाराच्या घरात आहेत. मात्र घाऊक बाजारातून रुग्णालयांना हेच औषध ८०० ते १२०० रुपयात मिळते. ही तफावत दूर क रण्याचे निर्देश कं पन्यांना प्रशासनाने दिले आहेत.

करोनाच्या उपचारासाठी प्रामुख्याने रेमडेसिवीर इंजेक्शन १००औषध प्रभावी ठरत असल्याचे आढळून आले आहे. सध्या बाजारात सहा प्रमुख उत्पादक कं पन्यांचे रेमडेसिवीर हे इंजेक्शन उपलब्ध आहे. या कंपन्यांच्या उत्पादनाच्या किरकोळ विक्री किमतीबाबत प्रशासनाने माहिती घेतली असता प्रत्येक कं पनीची किं मत अडीच हजाराहून अधिक असल्याचे आढळून आले. परंतु हेच औषध घाऊक विक्रेत्यांना रुग्णालयास ८०० ते १२०० रुपयांना पुरवठा होत असल्याचे आढळून आले आहे. किरकोळ विक्री किमत अधिक असल्याने विविध स्तरातून रोष व्यक्त होत होता. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव  सौरभ विजय यांनी या प्रकरणी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

या औषधाची घाऊक व किरकोळ विक्री किमतीतील तफावत बघता व्यापक जनहिताच्या दृष्टीने  केंद्र शासनाने औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ अंतर्गत अधिकाराचा वापर करून  रेमडेसिवीर इंजेक्शनची किरकोळ विक्री  किंमत निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव अन्न व औषध प्रशासनाने राष्ट्रीय औषध किंमत नियंत्रण प्राधिकरण, नवी दिल्ली यांना सादर केला  आहे. तसेच  रेमडेसिवीर इंजेक्शन च्या घाऊक विक्री किंमत व किरकोळ  किमत यातील मोठा फरक कमी करण्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने शनिवारी मुंबईतील  मुख्यालयात बैठक आयोजित केली  होती. या बैठकीला  सिप्ला ली., झायडस हेल्थकेअर , हेटेरो हेल्थकेअर, डॉ. रेड्डीज लँब, मायलनली. या उत्पादकांचे प्रतिनिधी तसेच रिटेल केमिस्ट व ड्रगिस्ट व घाऊक औषध विक्रेते संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी करोना उपचारासाठी लागणाऱ्या प्रमुख औषधाची किरकोळ विक्री किंमत कमी करण्याचा निर्णय घेण्याची सूचना केली.

किंमती अशा..(रुपयांत)

सिप्ला  : ४०००

झायडस हेल्थकेअर  : २८००

हेटेरो हेल्थकेअर : ५४००

डॉ. रेड्डीज लॅब  :५४००

मायलन  : ४८००

जुबिलंट जेनेरिक : ४७००