News Flash

दक्षिण, मध्य मुंबईत उद्या पाणीकपात

जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेतले जात असल्याने दक्षिण व मध्य मुंबईतील काही भागात शुक्रवारी आठ तासांसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असून

| January 9, 2014 02:03 am

जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेतले जात असल्याने दक्षिण व मध्य मुंबईतील काही भागात शुक्रवारी आठ तासांसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असून, काही भागात १५ टक्के कपात केली जाईल.
मुंबई सेंट्रल, एम. पी. मिल कंपाउंड, ना. म. जोशी मार्ग, बी. डी. डी. चाळ, डॉ. ई. मोझेस मार्ग, धोबीघाट क्लार्क रोड येथील पाणीपुरवठा पूर्ण बंद करण्यात येईल. याशिवाय ए, सी, डी, ई आणि जी दक्षिण भागातील अ‍ॅनी बेझंट रोड, डॉ. ई. मोझेस रोड येथे १५ टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. मरोशी- रुपारेल बोगदा प्रकल्पाशी संबंधित वैतरणा जलवाहिनीच्या (मलबार टेकडी जलाशय वाहिनी) जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2014 2:03 am

Web Title: reduction of water in south central mumbai tomorrow
Next Stories
1 मान्यता दत्त रुग्णालयात
2 मुंबईतल्या नर्तिकेवर सामूहिक बलात्कार
3 जिल्ह्यंनाही लवकरच विमानसेवा
Just Now!
X