News Flash

‘लहान मुलांना चांगला-वाईट स्पर्श कळतो’

पाच वर्षांच्या मुलीच्या विनयभंगप्रकरणी जामीन देण्यास नकार

(संग्रहित छायाचित्र)

लहान मुलांना चांगला आणि वाईट स्पर्श कळतो, असे नमूद करत पाच वर्षांच्या मुलीच्या विनयभंगाचा आरोप असलेल्या एकाला जामीन देण्यास विशेष न्यायालयाने नकार दिला.

या प्रकरणातील मुलीने साक्ष देताना स्पष्टपणे सांगितले होते की, आरोपीने तिला जेव्हा स्पर्श केला तेव्हा तो वाईट असल्याचे जाणवले. मुलगी खूपच लहान आहे म्हणून तिला चांगल्या आणि वाईट स्पर्शातील फरक कळत नाही असे म्हणता येणार नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

आरोपी या मुलीचा शेजारी असून ती त्याच्या घरी खेळण्यासाठी जात असे. त्याच्यावर या मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपासह पोक्सोअंतर्गत विविध कलमांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहे.

मुलगी खूप लहान असून आपण केलेला स्पर्श वाईटच होता हे ती सांगू शकत नाही, असा दावा आरोपीने केला होता. मात्र आरोपीवरील आरोप हा गंभीर स्वरूपाचा असून त्याला जामीन देता येणार नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 12:27 am

Web Title: refusal to grant bail in case of molestation of five year old girl abn 97
Next Stories
1 बैठकीतील सहभाग कर्तव्याचा भाग असल्याचा पुरावा काय?
2 माघी गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर
3 हेच तर देशाचे सौंदर्य!
Just Now!
X