News Flash

मेट्रो आड येणाऱ्या २५०० वृक्षांचे पुनरेपण

३२.३२ किमीच्या ‘मेट्रो-४’च्या उभारणीमध्ये सुमारे ४३८८ झाडे बाधित होणार आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

‘वडाळा ते कासारवडवली’ (मेट्रो ४) आणि ‘डी.एन.नगर ते मंडाले’ (मेट्रो २ ब) या दोन्ही मेट्रो मार्गिकांच्या आड येणाऱ्या सुमारे २५०० झाडांचे पुनरेपण शास्त्रीय पद्धतीने करण्याचा निर्णय ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ने (एमएमआरडीए) घेतला आहे. यासाठी वृक्ष पुनरेपण यंत्राच्या साहाय्याने ही झाडे लावणाऱ्या कंपनीची नियुक्ती करण्यात येणार आहे. मात्र महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर या झाडांच्या पुनरेपणाला परवानगी मिळेल.

शहारात सध्या मेट्रो मार्गिकांच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. ‘दहिसर ते डी.एन.नगर’ (मेट्रो २ अ) आणि ‘दहिसर (पू) ते अंधेरी’ (पू) (मेट्रो ७) या मेट्रो मार्गिकांचे काम प्रगतीपथावर आहे. तर ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो २ ब’ या दोन्ही मेट्रो मार्गिकांच्या प्राथमिक कामांना सुरुवात झाली आहे. या दोन्ही मार्गिकांच्या मूळ बांधकामाला सुरुवात करण्यासाठी प्रस्तावित मार्गात आड येणारी झाडे तोडणे आवश्यक आहे. मात्र झाडे कापण्याची परवानगी देणाऱ्या पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या स्थापनेबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पर्यावरणवाद्यांनी वृक्षतज्ज्ञांच्या मुद्दय़ाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. प्राधिकरणात वृक्षतज्ज्ञाची नेमणूक केल्याशिवाय झाडे कापण्याला आणि त्यांच्या पुनरेपनाला परावानगी न देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे ‘एमएमआरडीए’ला ‘मेट्रो-४’ आणि ‘मेट्रो-२ ब’ साठी कापण्यात आणि पुनरेपित करण्यात येणाऱ्या झाडांबाबत परवानगी मिळालेली नाही.

हजारो झाडांवर संकट

३२.३२ किमीच्या ‘मेट्रो-४’च्या उभारणीमध्ये सुमारे ४३८८ झाडे बाधित होणार आहेत. यातील ८७१ झाडे कापावी लागतील. तर २२६५ झाडांचे पुनरेपन करावे लागेल. तसेच ‘मेट्रो २ ब’साठी २९७ झाडे कापली आणि १९३ झाडे पुनरेपित केली जातील. या दोन्ही मेट्रोसाठी पुनरेपित होणारी सुमारे २५०० झाडांची पुनरेपनाची प्रक्रिया शास्त्रोक्त करण्याबाबत आता ‘एमएमआरडीए’ने पाऊल उचलले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2019 3:18 am

Web Title: regeneration of 2500 trees coming out of metro
Next Stories
1 शिक्षण, नोकऱ्यांसाठीच स्वतंत्र आरक्षण
2 धनगर समाजाच्या मागण्यांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन
3 एकतृतीयांश तरुणाई मतदार नोंदणीबाबत उदासीन
Just Now!
X