21 February 2019

News Flash

शिवसेनेला ‘अच्छे दिन’, सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष

शिवसेना पक्ष देशातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष झाला आहे.

( संग्रहीत छायाचित्र )

मुंबई : आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत महापालिकेमध्ये सत्तेत असेला शिवसेना पक्ष देशातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष झाला आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीच्या आधारावर असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) हा अहवाल तयार केला आहे.

एडीआरच्या आकडेवारीनुसार २०१६-१७ या आर्थिक वर्षात शिवसेनेला २५.६५ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. प्रादेक्षिक पक्षामध्ये शिवसेना आघाडीवर आहे. तर 24.75 कोटी रुपयांसह आम आदमी पार्टी दुसऱ्या क्रमांकावर आहे. 15.45 कोटी रुपयांसह तिसऱ्या क्रमांकावर पंजाबचा शिरोमणी अकाली दल आहे,

शिवसेना सर्वात श्रीमंत प्रादेक्षिक राजकीय पक्ष ठरला असला तरी, २०१५-१६ च्या तुलनेत त्यांना मिळालेल्या देणग्यांच्या रकमेत 70 टक्क्यांची घट झाली आहे. २०१५-१६ मध्ये शिवसेनेला ६१.१९ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. तर २०१६-१७मध्ये शिवसेनेला २५.६५ कोटींच्या देणग्या मिळाल्या आहेत.

First Published on August 10, 2018 7:43 pm

Web Title: regional parties collected rs 91 cr donations in 2016 17 shiv sena tops adr