लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी विभाग कार्यालयाचे प्रयत्न

मुंबई : धारावीतील रुग्णसंख्या आटोक्यात आलेली असली तरी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे याकरिता पालिके च्या जी उत्तर विभागाने प्रयत्न सुरू के ले आहेत. फे रीवाले, कामगार, भाजी विक्रे ते या गटातील लोकांपर्यंत पोहोचून पालिके चे कर्मचारी त्यांच्या नावाची नोंदणी करवून देत आहेत, तसेच त्यांना लसीकरण केंद्रावर घेऊन जाण्याचे कामही विभाग कार्यालयामार्फत के ले जात आहे.

धारावीत करोनाला थोपवण्यासाठी पालिके ने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याच पण त्याचबरोबर धारावीतील रहिवाशांचे लसीकरण करण्यासाठीही जी उत्तर विभागाने प्रयत्न के ले. त्यासाठी धारावीत पहिले स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. मात्र कामगार वर्ग असलेल्या या रहिवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने नागरिकांमध्ये लसीकरणाबद्दल जनजागृतीही करण्यात आली. मात्र तरीही लसीकरणाचा वेग फारसा नव्हता. त्यामुळे पालिके ने आता रहिवाशांपर्यंत पोहोचून नोंदणी करण्याचे ठरवले आहे अशी माहिती साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

धारावीत आतापर्यंत एकूण १९ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. सात लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या धारावीतील लसीकरणाचे हे प्रमाण अत्यल्प असून ते वाढवण्यासाठी विभाग कार्यालयामार्फत प्रयत्न सुरू आहेत.

सध्या धारावीतील नागरी आरोग्य केंद्रात व शास्त्रीनगर संक्रमण शाळेत लसीकरण केंद्र सुरू आहे. मात्र कामगार वर्गातील किं वा कष्टकरी वर्ग लोक लसीकरणाला यायला घाबरतात किं वा कं टाळा करतात. त्यामुळे आमचे कर्मचारी मोबाइल घेऊन फिरतात. बाजारपेठांमधील कामगार, फे रीवाले यांच्या बोलून त्यापैकी कोणी ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील असेल आणि त्यांचे लसीकरण झालेले नसेल तर त्यांची नावनोंदणी करून त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत आणण्याचेही काम के ले जाते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या लससाठा मर्यादित असल्यामुळे या मोहिमेलाही मर्यादा येत आहेत. मात्र हा वर्ग लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून हे प्रयत्न करीत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.