News Flash

प्रज्ञावंत तरुणाईच्या शोधाला आरंभ

‘लोकसत्ता’ तरुण तेजांकित उपक्रमासाठी नोंदणी ८ फेब्रुवारीपर्यंत

‘लोकसत्ता’ तरुण तेजांकित उपक्रमासाठी नोंदणी ८ फेब्रुवारीपर्यंत

मुंबई : तरुणाईच्या सर्जनशीलतेला, धडपड करण्याच्या जिद्दीला दाद देणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वाची नोंदणी सुरू झाली असून ८ फेब्रुवारीपर्यंत संकेतस्थळावर नोंदणी आणि शिफारस करता येणार आहे.

जिद्दीच्या जोरावर कर्तृत्वाची चमक दाखवणाऱ्या तरुण-तरुणींचा शोध ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमातून घेण्यात येतो. विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, क्रीडा, साहित्य, कला इत्यादी क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या तरुणाईमुळे ती क्षेत्रे समृद्ध होतात. त्याचबरोबर त्या क्षेत्रांमध्ये पाऊल टाकणाऱ्यांपुढेही आदर्श निर्माण होतात. असे आदर्श निर्माण करणाऱ्या तरुणाईचा शोध सुरू झाला असून नोंदणीसाठी प्रवेशपत्रिका ऑनलाइन भरणे अनिवार्य आहे.

विचारांना कृतीची जोड देत परिस्थिती बदलू पाहणारे अनेक तरुण आपल्याभोवती आहेत. सर्जनशीलता आणि जिद्दीच्या जोरावर ते आपल्या क्षेत्रात पाय रोवून उभे आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा त्या त्या क्षेत्रावर उमटला आहे. अशा तरुणाईला ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावरून थोरामोठय़ांकरवी कौतुकाची दाद मिळावी, त्याच्यातील सकारात्मकतेला वाव मिळावा, त्यांचा संघर्ष, यश समाजासमोर यावे हा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाचा उद्देश आहे.

विविध क्षेत्रांत नवे मानदंड निर्माण करणाऱ्या तरुणांच्या परिश्रमाचे, प्रज्ञेचे कौतुक ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमातून करण्यात येते. गेल्या दोन वर्षांत या उपक्रमांतर्गत २६ तरुण ऊर्जावंतांचा गौरव करण्यात आला. अनाथ, अपंगांसाठी धडपडणारे, कायद्याच्या माध्यमातून जनआंदोलनाचा आधार ठरणारे, तिरस्कृतांचे जीवन जगणाऱ्या तृतीयपंथीयांची सखी होऊन त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारे, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात ठोस काम करून सर्वसामान्यांचे आयुष्य सुकर करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाईला गौरविण्यात आले.

प्रवेश अर्ज कसा भराल?

या पर्वाच्या निवड प्रक्रियेचे तपशील    https://taruntejankit.loksatta.com/ येथे पाहायला मिळतील. या ठिकाणी असलेली प्रवेश पत्रिका  ऑनलाइन भरून पाठवणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर आपल्या भवताली दिसणाऱ्या गुणवंत तरुणांची नावे माहितीसह सुचवताही येणार आहे.

प्रायोजक : ‘नवी पिढी काहीच करत नाही’, हा गैरसमज आपल्या दमदार कर्तृत्वाने पुसून टाकणाऱ्या तरुणाईच्या गौरवाचा हा सोहळा ‘केसरी टूर्स’ पुरस्कृत आहे. सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक या उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत, तर ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ ‘पॉवर्ड बाय’ पार्टनर आहेत. उपक्रमाचे टेलिव्हिजन पार्टनर ‘एबीपी माझा’ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 3:20 am

Web Title: registration for loksatta tarun tejankit till february 8 zws 70
Next Stories
1 मुस्लीम आरक्षणावर मंत्र्यांचा खल!
2 लैंगिक छळप्रकरणी प्राचार्यावर लवकरच आरोपपत्र
3 देवनार कचराभूमीला मुदतवाढ
Just Now!
X