रिलायन्स कंपनीचा फोर जी टॉवर उभारताना स्थानिक रहिवाशांना धमकावल्याचा आरोपावरून मुलुंड पोलिसांनी रिलायन्स जिओच्या एका कर्मचाऱ्याला बुधवारी अटक केली. मिथिलेशकुमार सिंह (४६) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. खासदार किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
मुलुंड आणि नवघर परिसरात रिलायन्स जिओ कंपनीचा फोर जी टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. हे टॉवर हानीकारक असून त्याला स्थानिक रहिवाशांचा विरोध होता. त्यामुळे कंपनीचे अधिकारी या स्थानिक रहिवाशांना धमकावत असल्याची तक्रार खासदार किरीट सोमय्या यांनी रविवारी मुलुंड पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी चार कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला होता. बुधवारी पोलिसांनी मिथलेशकुमार या कर्मचाऱ्याला अटक केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 5, 2015 12:02 pm