आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांचा मुलगा पूर्वेश याला उच्च न्यायालयाने बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाईपासून दिलासा दिला. न्यायालयाने ‘ईडी’च्या तपासाला स्थगिती देण्यास मात्र नकार दिला.

‘टॉप्स ग्रुप’ या सुरक्षा कंपनीतील आर्थिक गैरव्यवहाराच्या ‘ईडी’कडून होणाऱ्या चौकशीविरोधात सरनाईक, त्यांची दोन्ही मुले विहंग आणि पूर्वेश, मेहुणा योगेश चांडेगाला यांनी याचिका केली आहे. ‘ईडी’ने मार्चमध्ये बजावलेल्या समन्सलाही त्यांनी आव्हान दिले आहे. याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सरनाईक, विहंग आणि सरनाईक यांच्या मेहुण्याला कठोर कारवाईपासून संरक्षण दिले आहे. त्यामुळे पूर्वेशलाही ‘ईडी’च्या कारवाईपासून संरक्षण देण्यात येत असल्याचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.