सोलापूर विद्यापीठाच्या नामकरणाच्या हालचाली वेग धरत असतानाच आता मुंबई विद्यापीठाच्या नामकरणाची मागणी केली जात आहे. मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सकल मराठी समाजाच्या वतीने पुण्यात करण्यात आली.
सकल मराठी समाजाच्यावतीने पुण्यात बुधवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यात सकल मराठी समाजाचे समनवयक राजेश खडके म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य राज्यातील प्रत्येक व्यक्तीला माहिती असून त्यांना त्या काळी अनेक भाषा येत होत्या. त्यांचे हे कार्य लक्षात घेता राज्य सरकारने मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीची दखल सरकारने लवकरात लवकर घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 2, 2018 2:52 pm