News Flash

शिखर बँक घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे वर्ग करा

मूळ तक्रारदाराची उच्च न्यायालयाकडे मागणी

(संग्रहित छायाचित्र)

शिखर बँक घोटाळ्यातील आरोपी हे सत्तेत असल्याने त्यांच्या दबावाखालीच मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आहे. त्यामुळे प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)कडे वर्ग करण्याची मागणी घोटाळ्याची पहिल्यांदा तक्रार करणाऱ्याने उच्च न्यायालयात केली आहे.

या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य ६९ जणांविरोधात कोणताही पुरावा सापडलेला नाही. त्यामुळे हे प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने सत्र न्यायालयात सादर केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कधीच निष्पक्षपातीपणे तपास केलेला नाही. तसेच आरोपी हे सत्तेत असल्याने राज्यातील तपास यंत्रणांकडून या घोटाळ्याचा पारदर्शी तपास कधीच होऊ शकणार नाही, असा दावा सुरिंदर अरोरा यांनी अ‍ॅड्. सतीश तळेकर यांच्यामार्फत याचिके द्वारे केली आहे.

प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा मुंबई पोलिसांचा अहवाल सत्र न्यायालयाने अद्याप स्वीकारलेला नाही; परंतु प्रकरणाचा तपास सीबीआयसारख्या तपास यंत्रणेकडे सोपवण्याचे अधिकार सत्र न्यायालयाला नाहीत, ते उच्च न्यायालयाला आहेत. त्यामुळे ही याचिका करण्यात आल्याचेही याचिकेत म्हटले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह घोटाळ्याशी संबंधित अन्य राजकीय नेत्यांची पोलिसांनी चौकशीही केली नाही. याउलट राजकीय दबावाखाली आणि आरोपींना पाठीशी घालण्याच्या हेतूने पोलिसांनी या प्रकरणी घोटाळा झाला नसल्याचा दावा केला आहे, असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.

अरोरा यांच्या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने २०१८ मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही पोलिसांनी म्हणावी तशी घोटाळ्याची चौकशी केली नाही.

बँकेच्या व्यवहारात मोठय़ा प्रमाणात अनियमितता आढळून आल्याचे नाबार्ड, नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी (कॅग) अहवालाद्वारे स्पष्ट के ले आहे. त्याकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी कधीच पारदर्शी तपास केलेला नाही आणि ते करणारही नाहीत. म्हणूनच तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2021 12:29 am

Web Title: report the shikhar bank scam to the cbi abn 97
Next Stories
1 शान्ता शेळके जन्मशताब्दीनिमित्त काव्योत्सव
2 संजय राठोड यांची गच्छंती अटळ !
3 दूरदेशीही आता बोलू कौतुके!
Just Now!
X