News Flash

रिपब्लिकन पक्ष चेंबूर येथील डीसीपी कार्यालयावर नेणार मोर्चा

कार्यकर्त्यास झालेल्या मारहणीचा निषेध नोंदवत, पोलीस निरीक्षकाच्या निलंबनाची करणार मागणी

रिपब्लिकन पक्ष चेंबूर येथील डीसीपी कार्यालयावर नेणार मोर्चा
संग्रहीत

आरसीएफ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र सोनवणे यांनी निरपराध आरपीआय कार्यकर्त्याला केलेल्या अमानुष मारहाणीचा निषेध करण्यासाठी, तसेच संबंधित पोलीस निरीक्षकास निलंबित करावे या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने मंगळावर दि. ८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता चेंबूर फाईन आर्ट जवळील पोलीस उपायुक्त कार्यलयावर निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेक,; मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, तालुका अध्यक्ष महादेव साळवे,अणुशक्ती नगर तालुका अध्यक्ष अनिस पठाण यांच्या नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात फिजिकल डिस्टन्स पाळून आणि मास्क घालून कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अणुशक्ती नगर सह्याद्री नगर येथील रिपाइं कार्यकर्ते बाबा सुंदरे यांना आरसीएफ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांच्याकडून बेदम मारहाण झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीच्या निषेध नोंदवत, संबंधित पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांना निलंबित करावे या मागणीसाठी डीसीपी कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती तालुका अध्यक्ष अनिस पठाण, महादेव साळवे यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2020 10:18 pm

Web Title: republican party to march on dcp office in chembur msr 87
Next Stories
1 आंतरराष्ट्रीय हेरॉईन रॅकेटचा पर्दाफाश
2 मुंबईत ‘एनसीबी’च्या कारवाईत अंमली पदार्थांचा साठा जप्त
3 “मुंबईतील सर्व ट्रेन्स, कार्यालयं १ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; शाळा जानेवारीत उघडा”
Just Now!
X