मराठा समाजास शासकीय, निमाशासकीय सेवा तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये १६ टक्के आरक्षण लागू करण्याबाबत सरकार दरबारी सुरू असलेल्या घोळाचा फटका पुणे विद्यापीठालाही बसला आहे. या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महत्त्वाच्या पदांसाठी सुरू केलेली भरती प्रक्रिया गेल्या दोन वर्षांपासून रखडवून ठेवली आहे. परिणामी हजारो उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्य़ातील तब्बल १०९९ महाविद्यालयांच्या कारभारावर नियंत्रण ठेवणाऱ्या पुणे विद्यापीठात उपकुलसचिव, वित्त व लेखाधिकारी, सहाय्यक कुलसचिव, जनसंपर्क अधिकारी, कक्ष अधिकारी यासह वर्ग एकची ४० तर वर्ग दोनची ५१ पदे रिक्त असल्याने त्याचा विद्यापीठाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. यातील महत्वाची अशी ६३ पदे भरण्यासाठी विद्यापीठाने जाहिरात प्रसिद्ध केली होती.  त्यानुसार हजारो उमेदवारानी अर्जही केले. मात्र, आरक्षणाच्या मुद्दय़ावरून ही परीक्षा लांबणीवर पडली