मुंबई : राज्य सरकारने निर्बंधाचा नवीन धंदा सुरू केला असून वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात, अन्यत्र कडक निर्बंध  राहतात. शिवसेना राज्यसभा खासदाराच्या जावयाकडून चित्रपटगृहमालकांशी वाटाघाटी सुरू असल्याचा आरोप भाजप आमदार आशीष शेलार यांनी बुधवारी केला.

त्यामुळेच हॉटेल, बारमालकांशी ‘वाटाघाटी’ झाल्यावर निर्बंध शिथिल झाले. तर दुसरीकडे आर्थिक अडचणीत असलेले मराठी चित्रपट व नाट्य कलावंत, लोककलावंत, मंदिरांजवळ धूप, अगरबत्ती, फुले विकणारे व्यावसायिक आहेत. ते ‘वाटाघाटी’ करू शकत नाहीत, म्हणून त्यांच्यावर निर्बंध लादले गेले आहेत. त्यांची उपासमार सुरू आहे. हा वाटाघाटीचा धंदा बंद करावा. आता गणेशोत्सव व नवरात्र मंडळांसोबत पण शिवसेना वाटाघाटी करणार का? असा सवाल करीत शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.