मुख्यमंत्र्यांची आज डॉक्टरांबरोबर बैठक

मुंबई  : संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आणि  राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानेच राज्याच्या ग्रामीण भागातील डॉक्टरांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज, रविवारी संवाद साधणार आहेत. कृति गटाचे सदस्यही यात सहभागी होणार असून, या संवादानंतरच एकू ण आढावा घेऊन राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल के ले जातील, असे संके त देण्यात येत आहेत.

करोनाबाधितांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी ‘माझा डॉक्टर’ ही संकल्पना मांडली आहे. त्यानुसार राज्यभरातील डॉक्टरांशी थेट संवाद साधत करोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करताना सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या डॉक्टरांना यात अधिकाधिक सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री करीत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्टर्सशी संवाद साधला होता. मुख्यमंत्री आज दुपारी १२ वाजता ग्रामीण भागातील वैद्यकीय चिकित्सकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये करोनावर उपचार या विषयावर राज्याच्या करोनाविषयक कृती गटाचे सदस्य डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी आणि डॉ. राहुल पंडित हे बोलणार आहेत. या ऑनलाइन कार्यक्रमात डॉक्टर्सनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन करोना लढाईला अधिक बळ देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम OneMD च्या फेसबुक www.facebook.com/rqquurqqysqvrxw/posts/tquqrtuzrryrsvz

आणि यूट्यूब चॅनेलवर https://youtu.be/xdHqXqFTC पाहावयास मिळेल. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समाजमाध्यमांवरूनही देखील याचे प्रसारण करण्यात येईल.

निर्णयाकडे लक्ष…

राज्यातील रुग्णसंख्या हळूहळू कमी होऊ लागल्याने निर्बंध काही प्रमाणात शिथिल करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. व्यापाऱ्यांनी काही वेळ तरी दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे के ली आहे. यातूनच करोना प्रभावित जिल्हे वगळता अन्यत्र काही प्रमाणात सवलत देण्याचा विचार सरकारच्या पातळीवर सुरू झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी विचारविनिमय करूनच हा निर्णय घेतला जाईल.