राज्यातील करोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांवर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. त्यानुसार पाचपेक्षा अधिक करोना रुग्ण असलेल्या गृहनिर्माण संस्था या करोना सुक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार असून तेथे प्रवेशबंदीचे निर्बंध असतील. तेथे बाहेरून येणारे घरकामगार आणि वाहनचालकांनाही याचे पालन करावे लागेल.

या नियमांचा भंग करणाऱ्या संस्थेस १० हजार रुपये दंड आकारला जाईल.

राज्यभरात झोपडपट्ट्यांच्या तुलनेत मोठ्या इमारती आणि गृहनिर्माण संकुलांमध्ये करोनाचा अधिक प्रमाणात होत असलेला शिरकाव  लक्षात घेऊन सरकारने हे नवीन निर्बंध लागू के ले आहेत. त्यानुसार एका सोसायटीमध्ये एकावेळी पाचपेक्षा अधिक करोना बाधित आढळल्यास सबंधित इमारत किं वा गृहनिर्माण संकुले हे करोना सुक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे. मात्र एकाच इमारतीमध्ये पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास ती इमारत की  संपूर्ण गृहनिर्माण संकु ल प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करायचे याचा निर्णय घेण्याचे अधिकार पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. बाहेरील वाहन चालक, घरकामगार यांना यांनाही प्रवेश बंदी असून इमारतीध्ये राहणाऱ्यांनाच  परवानगी असेल. सुरक्षा रक्षकांना व्यक्तीगत सुरक्षा साधणे ( पीपीई कीट)  बंधनकारक असून ती सोसायटीने द्यायची आहेत.   प्रवेशद्वारावर शरीराचे तापमान मोजणारे यंत्र तसेच जंतूरोधक ठेवणे आवश्यक आहे.

नियम काय?

करोना सुक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित इमारत किं वा गृहसंकुलाच्या प्रवेशद्वारावर तसा फलक लावण्यात येणार असून अशा इमारतीमध्ये ये-जा करण्यासाठी एकच प्रवेशद्वार उघडे असेल.  वैद्यकीय कारण किं वा अत्यावश्यक बाब वगळता या इमारतीमध्ये ये- जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. केवळ  कचरा उचलणे आणि साफसफाईसाठी कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. दुध, औषधे व अन्य अत्यावश्यक सामान  ई- कॉमर्सच्या माध्यमातून मागविता येईल. ते सोसायटीच्या प्रवेशद्वारावर ठेवले जाईल, संबंधितांना ते तेथून घेऊन जाता येईल.