News Flash

भाजीपाला, किराणा विक्रेत्यांवरही निर्बंध?

मदत पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांचा प्रस्ताव

राज्यातील १८ जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटविण्यात आल्याच्या विजय वडेट्टीवार यांच्या घोषणेने गुरुवारी गोंधळ उडाला होता.

राज्यातील करोनाची लाट रोखण्यासाठी टाळेबंदीच्या माध्यमातून सरकारने कठोर निर्बंध लागू केले असले तरी विविध भागांत रस्त्यांवर, किराणा दुकान, भाजीपाला खरेदीसाठी मंडईत मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याचे चित्र गुरुवारी होते. लोकांनी घरात थांबावे अन्यथा येत्या दोन दिवसांत निर्बंध अधिक कडक केले जातील. त्यानुसार भाजी मंडई, किराणा

विक्रे ते तसेच पेट्रोल विक्रीवर निर्बंध आणण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत असल्याचा इशारा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. हा वडेट्टीवार यांचा प्रस्ताव असून, मुख्यमंत्र्यांनी अद्याप तो मान्य केलेला नाही.

राज्यात टाळेबंदीची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. लोक रस्त्यांवर फिरत असून मंडईतही गर्दी होत आहे. टाळेबंदीचा पहिल्या दिवशी फारसा परिमाण न दिसल्याने आता आणखी निर्बंध लागू करण्याची तयारी सरकारने सुरू के ली आहे. त्याबाबत दोन दिवसांत कडक कारवाई केली जाणाार असून सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. तहसीलदारांच्या पत्रानुसार फक्त अत्यावश्यक सेवेसाठी इंधन दिले जाणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी माध्यमांना दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 12:50 am

Web Title: restrictions on vegetable and grocery sellers abn 97
Next Stories
1 उपनगरीय रेल्वे प्रवासाची सर्वसामान्यांनाही मुभा
2 रेमडेसिविरसाठी जीवघेणी धावपळ अनाठायी…
3 खासगी रुग्णालयातून पंचतारांकित हॉटेलात
Just Now!
X